वृ़क्षदाई प्रतिष्ठानच्या हाकेला साद घालत प्रा. विकास कंद यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या ३६ व्या वाढदिवसा निमित्त ३६ पिंपळाची झाडे सर्व वृक्षमित्र परिवाराच्या उपस्थितीत लावण्यात आली. तीन वर्षानंतर आज ही झाडे अतिशय सुंदर आणि मोठी झाली आहेत. या पिंपळाच्या झाडांचा तृतीय वाढदिवस व प्राध्यापक कंद यांचा ३९ वा वाढदिवस गुरुवार दि. ३० मे २०२४ रोजी सायं ०५ : ०० वा. संपन्न झाला.
प्रथमत: सर्व पिंपळ वृक्षांची पूजा करून फुलांनी सजावट केलेला सेंद्रिय खताचा केक प्रा. विकास कंद यांच्या हस्ते कापण्यात आला व सर्व ३६ वृक्षांना एक एक घमेले सेंद्रिय खताचा केक झाडांच्या मुळांशी देण्यात आला. अशाप्रकारे परोपकारी वृक्षांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून आगळा आणि वेगळा असा वृक्षांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपणही आपले वाढदिवस अशाच प्रकारे देशी वृक्षांची लागवड करून वृक्षांच्या सहवासात साजरे करा….