सांगोला या मतदारसंघात २५,३८३ स्वदेशी वृक्ष

सांगोल्याचे आमदार श्री बाबासाहेब देशमुख यांचा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक आगळा आणि वेगळा संकल्प …!

मी सांगोला या विधान सभेच्या मतदार संघांमध्ये जेवढ्या मताधिक्क्याने निवडून येईल तेवढी स्वदेशी झाडे मी माझ्या मतदारसंघात लावणार आहे. आपल्या सांगोला या मतदारसंघात २५,३८३ मतांनी ते निवडून आलेले आहेत. त्यामुळे ते पंचवीस हजार तीनशे त्र्याऐशी स्वदेशी वृक्ष लावणार आहेत.

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे l पक्षीही सुस्वरे आळविती ll

हा पर्यावरणाचा संदेश सर्व जगाला देणाऱ्या जगद्गुरु संत तुकोबारायांची जन्म आणि कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र देहू येथे त्यांनी येऊन आपण केलेल्या संकल्प पूर्तीसाठी महाराजांचे आशीर्वाद घेतले. व वृक्ष लागवड व त्याच्या संवर्धनासाठी साधक बाधक चर्चा केली. आमदार श्री बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांनी केलेला हा आगळा आणि वेगळा असा वृक्ष संवर्धनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्व वृक्षप्रेमींनी त्यांना सहकार्य व मदत करून वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध राहू या….!